शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

अंध-अपंगांच्या ‘डे-केअर’ केंद्रांना अनुदान मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:34 AM

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्देश दिले.

नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्देश दिले. नॅब संस्थेच्या पदाधिकाºयांनी दृष्टिबाधित आणि बहुविकलांग आणि अन्य दिव्यांग संवर्गाच्या एकूण २५ प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासमवेत राजभवन सभागृहात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सचिव रमेश डिसोझा, अपंग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे यांनी नॅब महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी झालेल्या बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय सचिव दिनेश वाघमारे, बी. वेणुगोपाल रेड्डी, संजयकुमार, सीताराम कुंटे, रणजित सिंह देओल, सुवर्णा खरात आदी उपस्थित होते.विशेषत: नॅब महाराष्ट्रच्या कर्णबधिर, अंधत्व, बहुविकलांग डे-केअर सेंटर २०००पासून अनुदानित व्हावे, तसेच २५ अंध मुलींना वसतिगृहात अनुदान मिळावे. शाळेतील विशेष शिक्षकांचे एक रिक्तपद तातडीने भरावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सामाजिक न्याय विशेष सहाय्य सचिव दिनेश वाघमारे यांनी संस्थेचे प्रश्न व दिव्यांगांचे सामान्य प्रश्न राज्यपालांना सादर करून शासनस्तरावरील कार्यवाहीची माहिती दिली. तसेच उर्वरित प्रश्नांसंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले.

टॅग्स :Nashikनाशिक