कळवण : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील शेतकºयांना शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व उपअभियान योजनेंतर्गत यांत्रिकीकरण व शेती अवजारे अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी एक ते सव्वालाख रुपये अनुदान देऊन ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जे.पी. गावित, के.एन. बहिरम, प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन, तहसीलदार कैलास चावडे, सुनील संचेती आदिंसह रवींद्र देवरे, यशवंत गवळी उपस्थित होते.महिला शेतकºयांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सव्वालाख रुपये, तर जनरल वर्गातील शेतकºयांसाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्टरसाठी ३४७ अर्ज दाखल झाले आहेत, तर अवजारांसाठी ५१३ शेतकºयांनी अर्ज केले आहेत. एकलहरे येथील शेतकरी अण्णा कृष्णा बोरसे यांना एक लाख रुपये अनुदान देण्यात येऊन ट्रॅक्टर खरेदी करून देण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, जितेंद्र शहा, सुनील संचेती, ए. बी. भगत, किशोर भरते आदींसह शेतकरी राकेश बोरसे, योगेश बोरसे, नारायण हिरे, सुभाष शिरोरे, हेमंत पाटील, गोविंद कोठावदे उपस्थित होते.
ट्रॅक्टर खरेदीसाठी सव्वालाखापर्यंत अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:57 AM