त्र्यंबकेश्वर : नगरपालिकेला अस्थायी लोकसंख्येच्या प्रमाणात यात्रेकरू अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे येथे यात्रेकरू, पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यांच्या समवेत गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ते त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी १.३० वाजता उभयतांचे आगमन झाले. त्र्यंबकेश्वर कोठी हॉलच्या गेटसमोर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, कैलास घुले भाजपाचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, सुयोग वाडेकर, तेजस्वी ढेरगे, नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी तथा देवस्थान ट्रस्टच्या सचिव डॉ. चेतना केरु रे, बांधकाम सभापती दीपक गिते, सागर उजे, माजी गटनेते रवींद्र सोनवणे आदींनी त्यांचे स्वागत केले.अभिषेक व आरती करून मुनगंटीवार व केसकर यांनी दर्शन घेतले. वामन गायधनी व सुयोग वाडेकर यांनी पौरोहित्य केले. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे दोन्हीही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुनगंटीवार म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी व गंगाद्वार परिसर हिरवागार करण्यासाठी स्वत: प्रयत्न करू. हे दोन्ही पर्वत आणि कुशावर्त मी दत्तक घेतले असून, वनविभागाचे अधिकारी दर आठवड्याला आढावा घेतील, असे त्यांनी सांगितले. गावाच्या समस्या व पालिकेच्या अडचणींबद्दल त्यांनी पालिकेच्या मुख्य अधिकारी डॉ. चेतना केरुरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार वनविभागाचे उपवन संरक्षक टी. बिवला, सहा. वनसंरक्षक स्वप्नील घुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे, वन परीमंडल अधिकारी सुनील झोपे, निवृत्ती कुंभार, मोहन पवार, वनरक्षक अलगट, सुनील पवार, ऋषीकेश जाधव आदी उपस्थितहोते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवसैनिकांची अनुपस्थितीत्र्यंबकेश्वर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार येणार असल्याने भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते; मात्र शिवसेनेचे मंत्री दीपक केसकर हे त्यांच्यासोबत असूनही शिवसेनेचे पदाधिकारी तर सोडाच; पण कार्यकर्तेदेखील उपस्थित नव्हते. याची उपस्थितांमध्ये चर्चा होत होती.
अस्थायी लोकसंख्येनुसार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:47 AM
त्र्यंबकेश्वर : नगरपालिकेला अस्थायी लोकसंख्येच्या प्रमाणात यात्रेकरू अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे येथे यात्रेकरू, पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यांच्या समवेत गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : त्र्यंबकेश्वर येथे केसकर यांच्यासह भेट