अंदरसूल : येथील बालमित्र सावता युवक गणेशमंडळ व सावता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती उत्सव साजरा करण्यात आला.भाद्रपद षष्ठी या दिवशी श्री ज्ञानेश्वर ग्रंथ जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त सावता युवक ग्रुपच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढली. अग्रभागी असलेल्या कलशधारी सुवासिनी लक्ष वेधून घेत होत्या. माळी गल्ली येथून पालखीला सुरूवात झाली. सय्यदवली चौक, मेनरोड, गणपती चौक, बालाजी चौक, सरकारवाडा, वेश, महात्मा फुले चौक, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, वैजापूर वेश मार्गे पुन्हा माळी गल्ली येथे आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस गाथामूर्ती तुकाराम महाराज मुळीक यांच्या कीर्तन झाले.तरुणांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज गाथा भागवत या ग्रंथांचे पाठ करावे. युवकांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लोकार्पण दिन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे गरजेचे आहे, मत तुकाराम महाराज मुळीक यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:45 PM
अंदरसूल : येथील बालमित्र सावता युवक गणेशमंडळ व सावता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती उत्सव साजरा करण्यात आला.भाद्रपद षष्ठी या दिवशी श्री ज्ञानेश्वर ग्रंथ जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त सावता युवक ग्रुपच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारंपरिक वाद्याच्या गजरात ...
ठळक मुद्देअंदरसूल : वाद्यांच्या गजरात सुहासिनींनी काढली मिरवणूक