कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधायुक्त आणि वातानुकुलीत बांधण्यात आलेल्या कांदा , डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने एजन्सीने मान्यता दिल्याने या केंद्रावरु न आता थेट अमेरिका युरोप व इतर देशात द्राक्षे ,डाळींब यांची निर्यात होणार आहे.युरोपमध्ये द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने युरोपमध्ये द्राक्षे जावीत यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिक आग्रही असतात. मात्र द्राक्ष युरोपला न जाता व्यापारी अन्य देशात पाठवावी लागतील असे सांगून भाव कमी करण्याचे उद्योग करतात. त्यामुळे आता या केंद्राला कृषी व प्रक्रि या अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) मान्यता दिल्याने भेंडी येथून थेट युरोपला शेतमालाची निर्यात होणार आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व शेतकरी सहकारी संघ लि कळवण यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भेंडी येथील कांदा व डाळींब निर्यात सुविधा केंद्राला अपेडाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दूर केल्यानंतर दुसºया पाहणी दौºयात निर्यात सुविधा केंद्राचे परीक्षण केल्यानंतर केंद्र सरकारने अपेडा या वाणिज्य मंत्रालयांर्गत येणाºया प्राधिकरणाची मान्यता दिली आहे.त्यामुळे निर्यात सुविधा केंद्रातून थेट निर्यात शक्य होणार आहे.अपेडाचे निर्यात सुविधा केंद्रातील अधिकारी हे सुविधा केंद्रातून कंटनेर भरल्याचे प्रमाणपत्र देणार असून त्यानंतर युरोप व अमेरिकेत द्राक्ष व डाळींबाची निर्यात होणार आहे. यापूर्वी निर्यात सुविधा केंद्रातून यूरोप व अमेरिकेला द्राक्ष व डाळींब पाठविता येत नसल्याने अपेडाची मान्यता मिळविण्यासाठी पुणे येथील कृषी व पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुनील पवार यांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालय व अपेडा प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने मान्यता मिळाली आहे. येणाºया हंगामात कळवणसारख्या आदिवासी व ग्रामीण भागातील कांदा व डाळीब निर्यात सुविधा केंद्रातून थेट युरोप व अमेरिकेसह इतर देशात निर्यात होणार आहे.उपलब्ध सुविधा-भेंडी येथील निर्यात सुविधा केंद्र शेतमालाच्या साठवणुसाठी उपयुक्त असून केंद्रात कांदा प्रत ग्रेडिंग मशीन बसविण्यात आल्याने मशीनमध्ये कांदा टाकल्यास मशीनद्वारे त्याची प्रतवारी करता येते.डाळिंब व द्राक्ष यांची साठवणूक करण्याची सुविधा असून केंद्र वातानुकुलीत आहे. ५० टन वजनाचा शीतगृहात भूमिगत वजनकाटा आहे. कांदाप्रत ग्रेडिंग मशीन व कुलिंग मशीन असून५०केव्ही क्षमतेचे चार जनरेटर आहेत. अंतर्गत सिमेंट रस्ते असून २५०० टन क्षमतेच्या १० कांदाचाळी असून ५० मेट्रिकटन क्षमतेचे द्राक्ष ,डाळिंब कोल्डस्टोरेज आहे .५ मेट्रिक टन पर कुलिंग सुविधा केंद्रात उपलब्ध आहेत.भेंडी येथे कांदा व डाळींब निर्यात सुविधा केंद्र व्हावे यासाठी माजी आरोग्यमंत्री स्व डॉ दौलतराव आहेर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानंतर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातीसाठी मान्यता दिल्याने थेट युरोप , अमेरिकेला द्राक्ष व डाळींब जाण्याची सुविधा निर्माण झाली.- सुधाकर पगारअध्यक्ष ,शेतकरी सहकारी संघ लि, कळवण