शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी लिलाव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 5:22 PM

लासलगाव : खानगांव नजिक व परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या खानगांव नजिक येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.१) द्राक्षेमणी शेतीमाल लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रिती बोरगुडे यांनी दिली.

ठळक मुद्देबाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना खरेदी करणा-या द्राक्षेमणी खरेदीदारांवर कारवाई

लासलगाव : खानगांव नजिक व परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या खानगांव नजिक येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.१) द्राक्षेमणी शेतीमाल लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रिती बोरगुडे यांनी दिली.खानगांव नजिक सह परीसरातील वनसगांव, ब्राम्हणगांव (व.), खडक माळेगांव, सारोळे खुर्द, रानवड, कोटमगांव आदि गावांमध्ये शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांच्या मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीतर्फे खानगांव नजिक येथे केंद्रास शेतकरी व व्यापारी बांधवांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी देखिल खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परीसरातील शेतकरी बांधवांनी खानगांव नजिक येथील खरेदी-विक्री केंद्रावर आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणा-या द्राक्षेमणी खरेदीदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहे. बाजार समितीच्या खानगांव नजिक येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी शेतीमाल खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास संबंधित व्यापा-यांना तात्काळ लायसेन्स देऊन खरेदी-विक्री केंद्रावर पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. सोमवारी दुपारी ४ वाजता होणा-या द्राक्षेमणी लिलाव शुभारंभास बाजार समितीच्या पदाधिका-यांसह परीसरातील सोसायटी आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, शेतकरी, अडते, खरेदीदार, मदतनीस यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी