लखमापूर : संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील तीन ते चार हंगामापासून द्राक्षे पिकांने बळीराजांला कोणत्याही स्वरूपाची साथ दिली नाही. जवळचे होते नव्हते ते भांडवल खर्च करूनही हातात एक नवा पैसाही मिळाला नाही. त्यात विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व इतर ठिकाणाहून घेतलेल्या कर्जाची परत फेड करायची कशी? घरगाडा हाकायचा कसा ? कर्ज घ्यावे तरी किती? ज्या शेतीच्या जोरावर कर्ज घेतले, तीच शेती तोट्यात आल्यानंतर ते घेतलेले कर्ज फेडावे कसे अशा नानाविध प्रकारच्या प्रश्नांनी द्राक्ष पंढरीतील बळीराजा हतबल झाला आहे. आता या ग्रहणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी शेती पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. जर शेतकरी वर्गाने शेतीपद्धतीमध्ये बदल केला तर द्राक्षे पिकांवर अवलंबून असणारे व्यवसाय त्यात बेदाणा, वाइन प्रकल्प आदींवर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.वाइन उद्योगाला उतरती कळा चार पाच वर्षांपूर्वी वाईन उद्योगाला सुगीचे दिवस होते. परंतु सध्या द्राक्षे पिकाला लागलेली घरघर पाहता फक्त बोटावर मोजण्याइतके वाईन प्रकल्प सध्या सुरु आहेत. वाईन ग्रेप्सचा माल पूर्णपणे उचलला जात नाही. काही माल तसाच शिल्लक राहतो व उरलेल्या मालाचे करायचे काय? त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो. यामुळे बरेच शेतकरी वाईन उद्योगाला माल देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे वाईन उद्योगाला सध्या उतरती कळा लागली आहे.
द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 1:31 AM
संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देउत्पादक चिंतित : अस्मानी, सुलतानी संकटांची मालिका सुरूच