सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे कांद्याची शेड उडून लाखोंचे नुकसान झाले आहे.तीन महिन्यांपासून दङी मारलेल्या पावसाने सोमवारी अखेर सायखेडा परिसरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात थोङे का होईना समाधान पसरले आहे. संध्याकाळी सहा वाजेनंतर सायखेडा परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सायखेडा परिसरातील शिंगवे करंजगाव सोनगाव चाटोरी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. महिनाभर दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.गेल्या काही दिवसापासून आॅक्टोबर हीट चा अनुभव घेणाºया ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला.सुरूवातीला संथ पङणार्या पावसात जोरदार वारे वाहायला लागले. वादळी वार्यामुळे सोनगाव- करंजगाव रस्त्यावर शिंगवे (ता. निफाड) शिवारात असणार्या सायखेडा येथील कांदा व्यापारी महेश भुतडा यांच्या शेडचे छत कोसळून मोठे नुकसान झाले. शेडमध्ये असणारा २००० कांदा भिजला त्यामुळे त्यांचे अंदाजे अंदाज दहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. तर शिंगवे येथील सुभाष कोरडे यांची द्राक्ष बाग उखडल्याने पूर्णत: कोसळल्याने लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.सायखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी सोयाबीन, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गरज असतांना पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मात्र पडलेल्या या पावसाने फक्त थोडा आधार दिल्याचे शेतकरी बोलत आहेत.उन्हाळभर पाणी देऊन जगविलेल्या द्राक्ष बागेचा हंगाम सुरू झाला असतांनाच अचानक आलेल्या वादळी पावसाने बाग पूर्णपणे अँगलसह उखडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. लाखो रु पये खर्च करून उभी केलेली कुटुंबाची मिळकत क्षणात भुईसपाट झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहेसुभाष कोरडे,शेतकरी शिंगवे.कांदा साठवणूकीच्या शेङचे सत्तर टक्के नुकसान झाले.पावसाच्या पाण्याने कांदा भिजला.त्यामुळे दहा लाखाचे नुकसान झाले.महेश भुतडा, कांदा व्यापारी सायखेडा.
शिंगवे येथे द्राक्ष बाग वादळाने भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 5:27 PM
सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे कांद्याची शेड उडून लाखोंचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देकांदा शेड कोसळून २ हजार क्विंटल कांद्याचे नुकसान