जळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली. जे काही वाचले त्या बागांवर डावणी रोगाने आक्र मक केल्यामुळे बºयाच बागा सगळा खर्च करून सोडून देण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली, तर उशिराच्या बागा उत्तम आल्या. आता चार पैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कोरोना संकट उभे राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत.मागील वर्षी द्राक्षबागा छाटणीनंतर सुरू झालेला पावसायामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या द्राक्षबागा समस्यांच्या विळख्यात सापडल्याने गळ, कुज, डावणी, भुरीचा प्रार्दुभाव झाल्याने अनेक शेतकर्यांना फटका बसला. यावर्षी शेतकर्यांनी सावध होत द्राक्ष छाटणी हवामानाचा अंदाजानुसार घेत आहेत.पावसाने पाने झाली खराबया वर्षात सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागेची पाने खराब होत आहेत. त्यामुळे द्राक्षाच्या काडी परिपक्वतेवर पारिणाम होत आहे.अर्ली द्राक्ष छाटणी करावी की नाही?मागील वर्षी सर्वात जास्त फटका बसला तो द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना.अर्ली द्राक्ष बागा अतिवृष्टीमुळे कुज,डाउनी, भुरी, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने निर्यातक्षम द्राक्ष बागांवर परिणाम झाला. तर उशिरा छाटलेल्या बागा कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने अनेक शेतकर्यांच्या द्राक्षबागेत व्यापार्यांअभावी झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे यावर्षी शेतकरी अर्ली द्राक्ष छाटणी करावी की नाही अशा संभ्रमात पडला आहे.मागील वर्षी १ सप्टेंबरला छाटणी केली; पण छाटणी केल्यानंतर वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने द्राक्षाची कुज होऊन घड गळाल्याने व नंतर डावणीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्यामुळे यावर्षी द्राक्ष छाटणी उशिरा घेण्याचा निर्णय घेतला.- नवनाथ शिंदे, द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊर
जळगाव नेऊर परिसरात द्राक्ष बागायतदार संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 4:57 PM
जळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली. जे काही वाचले त्या बागांवर डावणी रोगाने आक्र मक केल्यामुळे बºयाच बागा सगळा खर्च करून सोडून देण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली, तर उशिराच्या बागा उत्तम आल्या. आता चार पैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कोरोना संकट उभे राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत.
ठळक मुद्देसावध पवित्रा : छाटण्या उशिराने होेण्याची शक्यता