काही दिवसांपूर्वी समतोलीत वातावरण असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवीत होऊन उत्साह वाढला होता. मात्र, सध्यस्थितीतील बदलत्या वातावरणामुळे त्या उत्साहावर पाणी फिरले आहे. हा उत्साह औटघटकेचा ठरतो की काय अशी भीती उत्पादकांच्या मनात उभी ठाकली आहे. कारण सध्या स्थानिक म्हणजेच देशांतर्गत ठिकाणी विक्री करण्यासाठीची द्राक्षे दिंडोरी तालुक्यातील काही भागांत असली, तरी अपेक्षित व समाधानकारक भाव नाही. निर्यातक्षम द्राक्षे क्लीष्ट व गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडत उत्पादकांनी उत्पादित केली. कृषी घटकाचे नियम व निकष यांची पूर्तता करून द्राक्षविक्रीसाठी तयारी केली, काही उत्पादकांचे व्यवहारही झाले. काही उत्पादकांची खुडणीही सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीतील वातावरण व हवामान उत्पादकांच्या उत्साहावर विरजण घालणारे आह. दिल्ली व लगतच्या राज्यांमध्ये सध्या थंडी वाढलेली आहे, दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षे खरेदीसाठी या भागातील ग्राहकही पसंती देतात, तसेच चांगल्या प्रतीच्या स्थानिक उत्पादित द्राक्षांनाही मागणी असते. मात्र, प्रतिकूल वातावरणाचा फटका बसण्याची चिन्हे उभी ठाकली आहेत. युनायटेड किंगडम या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त परदेशोय भागात, तसेच इतर परदेशीय भागात तालुक्यातील द्राक्षे विक्रीसाठी जात आहेत. मात्र, कडक नियम व अटींची पूर्तता करण्यासाठी दमछाक होते आहे. कारण उपलब्ध नमुना व व्यवहार निश्चितीनंतर खुडणी केलेल्या द्राक्षांमधे तफावत आढळली, तर ठरलेल्या दरात व्यवहार फिस्कटण्याची शक्यता अधिक असल्याच्या भीतीनेही उत्पादकांना हैराण केले आहे.
थंडीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 8:08 PM
वणी : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, तापमान घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चलबिचल वाढली आहे. वणी व परिसरात थंडीचा प्रभाव वाढला आहे.
ठळक मुद्देदोन दिवसांपासून तपमानात घसरण