ठळक मुद्देदिवसरात्र मेहनत घेऊन वेळोवेळी औषधांची फवारणी केली.
मानोरी : जगभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने जगबंदी, देशबंदी झाली आहे. यामुळे निर्यातक्षम द्राक्ष व स्थानिक बाजारपेठेत जाऊ शकणाऱ्या द्राक्षाला खरेदीदार नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड, मानोरी खुर्द परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड केली जाते. यावर्षी द्राक्ष उत्पादनही चांगले आलेले होते, मात्र महिनाभरापूर्वी अनेक व्यापाऱ्यांनी एक्स्पोर्ट द्राक्षबागा शंभर सव्वाशे रुपये असा उच्चांकी दर देऊन धरून ठेवला होता.मात्र, अचानक आलेल्या कोरोना संकटाने व्यापारीवर्गाने हात वर केले आणि द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले. दिवसरात्र मेहनत घेऊन वेळोवेळी औषधांची फवारणी केली.