लासलगाव : लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.फुलोेºयात असणाºया द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात छाटण्या घेतलेल्या बागांत सध्या द्राक्षमणी तयार होऊ लागल्याचे चित्र आहे. एकदा द्राक्षमणी सेट झाले की वातावरणातील बदलाची फारशी काळजी रहात नाही. परंतु अशा बागांचे प्रमाण किती यावर एकूण उत्पादन अवलंबून असेल. द्राक्ष उत्पादक औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ढगाळ हवामानाने फुलोरा स्थितीमधील बागांना नुकसानकारक ठरणार आहे. तसेच द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय या वातावरणात डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर बागांवर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी करून डावण्या आटोक्यात आणावा लागेल. परिणामी द्राक्ष बागायतदारांनी शेती औषधांच्या दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी गर्दी करत असून, आर्थिक संकत गडद झाले आहे. सध्या औषधांच्या फवारणीशिवाय काहीच पर्यायनाही. त्यामुळे डावण्याचे प्रमाणबघून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधाची मात्रा ठरवून फवारणी सुरू केलीआहे.कर्ज काढून फवारणीलासलगाव, टाकळी, कोटमगाव, खडक माळेगाव, उगाव, वनसगाव, सारोळे, नैताळे या भागातील द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाबरोबर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे फळकूज होण्याची भीती निर्माण झाली आहे. या वातावरणाचा फाटक बसला आहे. महागडी औषधे तसेच कर्जे काढून द्राक्षबागा जतन करून द्राक्षबागेवर औषध फवारणी सुरू आहे.द्राक्ष उत्पादक हे औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ढगाळतसेच पावसाळी वातावरण द्राक्षबागांना नुकसानकारक ठरणार आहे. निर्यातक्षम द्राक्षांना आता मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे. ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर द्राक्ष उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. - संदीप ठोंबरे, द्राक्ष उत्पादक
द्राक्ष उत्पादकांना फुटला बदलत्या हवामानाने घाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:25 PM
लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देलासलगाव : फवारणीचा खर्च वाढल्याने आर्थिक संकट