लासलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात थांबल्याने द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत असून, अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांवर आता अनेकांकडून कुºहाड चालविली जात आहे. त्यातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी तर लाखो रुपयांचा द्राक्षमाल फेकायचा कुठे या विवंचनेत तो चक्क कांदा चाळीत, घराच्या गच्चीवर तसेच शेतात पसरून दिला आहे.व्यापारी खरेदी बंद असल्याने द्राक्षे पिक काढणी करून पडून आहे. त्याला व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, तर कवडीमोल दर मिळत असल्याने त्याचा वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांकडून खुडव्याला आलेल्या द्राक्षांच्या बागांवर कुºहाड चालवली जात आहे, तर काही शेतकºयांनी त्याच्या बेदाणा तयार करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु, त्यासाठी लागणाºया साधनांचीही अनुलब्धता असल्याने बेदाणा करणेही अवघड होऊन बसले आहे. निफाड तालुक्यातील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी आपल्या शेतातील द्राक्षे शेतात, कांदा चाळीत व घराच्या छतावर टाकून दिली आहेत.या पिकाची इतरत्र विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने ते वेलीवर पाच महिने ठेवले तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या पिकास मुकावे लागणार आहे. त्यामुळे वेलीवरून पीक काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.सदर पीक तयार करणेस अंदाजे पाच ते सहा लाख रुपये खर्च झाल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.
शासनाच्या निर्णया मुळे निर्यात व्यवस्था अडचणीत आली आहे. वास्तविक शासन ज्या सुरक्षिततेच्या उपाय योजना सांगत आहे त्या निर्यातदार गेल्या काही दशकांपासून करत आहे. कोरोना काही दिवसांत संपेल मात्र अवघ्या काही दिवसांचा शिल्लक असलेला द्राक्ष हंगाम पुन्हा सुरु होणार नाही व याचा फटका शेतकºयांना अनेक वर्ष सोसावा लागणार आहे.- सुरेश कळमकर, द्राक्ष निर्यातदारद्राक्षबागांवर चालविली कुºहाडदिंडोरी : मोहाडी येथील नारायण एकनाथ जाधव या शेतकºयाने सुमारे तीनशे क्विंटल द्राक्ष असलेली दोन एकर द्राक्षबाग पंधरा दिवसांपासून विक्र ीसाठी तयार ठेवली होती. मात्र कोरोनाच्या हाहाकारामुळे द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी फिरकत नाही. त्यातच बेदाणे बनविण्याचा विचार समोर आला तर त्यासाठी आवश्यक असणारी औषधे मिळत नसल्याने शेवटी जड अंत:करणाने मोठ्या कष्टाने उभी केलीली द्राक्षबाग जाधव यांनी उभ्या पिकासह तोडून टाकली आहे. नारायण जाधव यांची एक बाग वीस दिवसांपूर्वीच बेदाण्याला दिली आहे. त्याचीही एक दमडीही त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही. यामुळे आता त्यांच्यावर असलेले सुमारे दहा लाखांचे कर्ज, हातउसने, पावडरवाल्याची उधारी, द्राक्ष मजुरांची मजुरी व पाच-सहा जणांचे कुटुंब यांचा चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.