लासलगांव : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील अण्णासाहेब पाटील-डुकरे यांचे थॉमसन जातीचे द्राक्ष बिहार राज्यात निर्यात होण्यासाठी सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेलच्या माध्यमातून प्रथमच द्राक्षांच्या या हंगामात बिहार राज्यातील दानापूर-पटना येथे १०२ क्रेटस्मधून १ टन २० किलो द्राक्ष निर्यातीसाठी रवाना झाले आहेत.किसान रेलमध्ये लोडिंग करण्याअगोदर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते द्राक्ष क्रेट्सचे पूजन करण्यात आले. यावेळी लासलगाव रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जे एच हिंगोले, स्मिता कुलकर्णी,ज्योति शिंदे, रंजना शिंदे , सतीश सोळसे आदी उपस्थित होते. आता थंडीचा जोर ओसरू लागल्याने येणाऱ्या दिवसात निर्यातीसाठी जास्तीजास्त द्राक्ष दाखल होईल , असा आशावाद लासलगाव रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाचे प्रमुख विजय जोशी यांनी व्यक्त केला.
किसान रेलने द्राक्षे प्रथमच परराज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 8:12 PM
लासलगांव : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील अण्णासाहेब पाटील-डुकरे यांचे थॉमसन जातीचे द्राक्ष बिहार राज्यात निर्यात होण्यासाठी सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेलच्या माध्यमातून प्रथमच द्राक्षांच्या या हंगामात बिहार राज्यातील दानापूर-पटना येथे १०२ क्रेटस्मधून १ टन २० किलो द्राक्ष निर्यातीसाठी रवाना झाले आहेत.
ठळक मुद्देसभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते द्राक्ष क्रेट्सचे पूजन