नाशिक : ‘महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे. यामुळे काही टवाळखोर, रोडरोमीयोंना चाप बसला असला तरी ११ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल १८८ आणि बलात्काराच्या ५२ घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या आहेत. यावरून शहरात महिला अत्याचाराचे स्वरूप सहज लक्षात येते.कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक पुण्यननगरीत महिला अत्याचाराचे पाप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस आयुक्तालयांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकासह विविध उपक्रम हाती घेतले आहे. शहरातील महिलांची वर्दळ असलेल्या ‘हॉट स्पॉट’ची निवड करून त्या ठिकाणांवर साध्या वेशात अन् वाहनात महिला, पुरूष पोलीसांचे पथक ‘वॉच’ ठेवून आहे. या निर्भया पथकाकडून गर्दीच्या ठिकाणी टवाळ्या करणा-या टवाळखोरांवर कारवाईदेखील होत आहे; मात्र महिलांचे विनयभंग व बलात्काराच्या घटनांची आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. विनयभंग, बलात्कारसारख्या घटनांमध्ये बहुतांशवेळा संशयित आरोपी हे पिडितेच्या ओळखीचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.--इन्फो--...तर १०९१ डायल करा !संकटात सापडलेल्या महिलेने निर्भयाच्या ‘१०९१’ या अतीजलद टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पोहचविली जात असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. तसेच विविध शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, उद्यानांच्या परिसरातदेखील निर्भया पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी संवाद साधून महिलांना जागरूक केले जात आहे. जेणेकरून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.विनयभंग : वर्ष - २०१८ (नोव्हें.अखेर) : १७४विनयभंग : वर्ष - २०१९ (नोव्हें.अखेर) : १८८बलात्कार : वर्ष - २०१८/ २०१९ : ५२१७५ गुन्ह्यांची उकलयावर्षी घडलेल्या विनयभंगाच्या १८८ गुन्ह्यांपैकी १७५ गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी १६९ गुन्ह्यांमधील संशयितांचा शोध पोलिसांनी घेतला होता. मागील वर्षी व चालू वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात ५२ बलात्काराच्या घटना घडल्या तर या पंधरवड्यात दोन अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झाल्याची नोंद झाली. या दोन्ही घटनांमधील संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत; मात्र मागील ५२ गुन्ह्यांमधील संशयित अद्याप निष्पन्न होऊ शकलेले नाही.
नाशिक पुण्यनगरीत महिला अत्याचारसारख्या पापांचा आलेख वाढताच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 5:24 PM
११ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल १८८ आणि बलात्काराच्या ५२ घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या आहेत.
ठळक मुद्दे११ महिन्यांततब्बल १८८ विनयभंगमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकपोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराच्या ५२ घटना