लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकच्या नाट्यसंस्कृतीचा मानबिंदू म्हणून ओळखले जाणारे महाकवी कालिदास कलामंदिर दुरुस्ती व देखभालीसाठी एक वर्ष बंद राहणार असल्याने या नाट्यगृहाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने ‘नाट्यसेवा’तर्फे गुरुवारी (दि. १३) एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या एकांकिका महोत्सवात नाट्यगृहाने नवकलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ तसेच या रंगभूमीने घडवलेले कलाकार यांच्याबाबत बोलताना अखिल भारतीय नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी या प्रकारचा महोत्सव राबविणे ही अभिनव संकल्पना असल्याचे सांगितले. नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी आगामी काळात कालिदास कलामंदिरचे नवे रूपडे रसिकांसमोर येईल तेव्हा नाटकेही नव्या रूपात यायला हवी, तसेच तिच तिच नाट्यकलाकृती सादर करण्यापेक्षा रंगकर्मींनी बदल घडवून आणणे आवश्यक आहे, याकडेही सचिन शिंदे यांनी लक्ष वेधले.
एकांकिका महोत्सवातून ‘कालिदास’प्रती कृतज्ञता
By admin | Published: July 14, 2017 6:24 PM