नाशिक : मार्च महिन्यापासून कोविडच्या महामारीत डाँक्टर्स, नर्सेस, सफाई कमर्चारी, सर्व प्रशासकीय अधिकारी काम करत आहेत. या सर्वांना कोविड योद्धे म्हणुन गौरवण्यात देखील आले. परंतु ह्या सर्वामध्ये फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी यांचा उल्लेख कमी केला जातो. मात्र जागतिक फामर्सी दिनानिमित्त फार्मसिस्टच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कोविड रूग्णालयात दाखल रुग्णांना वेळेत सर्व औषधी उपलब्ध करुन देणे, आवश्यक अशी साधन सामग्री देणे, अत्यंत महत्वाचा असा आँक्सिजन पुरवठा करणे, लँब साठी लागणारी यंत्रणा उभी करणे, शासन स्तरावर सर्व अहवाल सादर करणे, औषधांची व सामग्रीची कमतरता भासल्यास इतर जिल्ह्यातुन अर्ध्या रात्रीतून भरुन काढणे ह्या सारखी विविध कामे ही फार्मासिस्ट मंडळी अहोरात्र करत आहेत. त्यांच्या या कामाचे एक कौतुक व आभार म्हणुन जिल्हा रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. निखिल सैंदाणे यांनी जिल्हा रूग्णालयातील फार्मासिस्टचे पुष्पगुच्छ देऊन जागतिक फामर्सी दिना निमित्त आभार व्यक्त केले. अशीच अविरत सेवा आपण जनतेला देत रहावी याकरिता जिल्ह्यातील सर्व फार्मासिस्ट यांना प्रेरीत केले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी देखील जिल्ह्यातील सर्व फार्मासिस्ट यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली.