नाशिक : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव सोहळा लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने खुटवडनगरजवळील सिटू भवनजवळ माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. खेळामुळे खिलाडूवृत्ती वाढते. मानसन्मान मिळतोच. खेळात चांगले करिअर करता येते. विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमातील आभासी जगातून बाहेर पडून आपल्या आवडत्या खेळासाठी क्रीडांगणावर उतरले तर व्यक्तिमत्त्व सुधारते असा सूर मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला. या सोहळ्याच्या पहिल्या सत्रात सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी शैलजा जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, आंतरराष्ट्रीय बास्केट बॉलपटू आदित्य अष्टेकर आणि मुग्धा थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैलजा जैन, आदित्य आष्टकेर, मुग्धा थोरात यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी विनोद दशपुते, गिरीश मालपुरे, नीलेश कोतकर, जितेंद्र कोठावदे, विजय मेखे, उमाकांत वाकलकर, नितीन दहीवेलकर, चिन्मय धामणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन बागड यांनी केले.खेळाची आवड जोपासण्याची गरजजिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळात यशस्वी करिअर करता येते असे सांगून, मानवी शरीर अनमोल असून, ते केवळ खेळामुळेच निरोगी राहते, असे सांगितले. प्रत्येकानेच एकातरी खेळाची आवड जोपासली तर आजार जवळ येणार नाहीत असे नमूद केले.
लाडशाखीय वाणी मित्रमंडळातर्फे प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:46 AM