दिंडोरी : कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भनवड येथे सन २०१५-१६ मधील इयत्ता पहिली ते दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.प्रारंभी एलआयसीचे वरिष्ठ शाखा प्रबंधक मुकुंद पद्मनाभी, विकास अधिकारी किरण काळे, माध्यमिक मुख्याध्यापक जी.एल. भुसाळ यांनी सरस्वतीमातेचे पूजन केले. याप्रसंगी पद्मनाभी यांनी बिमा स्कूल व बिमाग्राम या नवनवीन योजनांची माहिती पटवून सांगितली. त्यानंतर किरण काळे यांनी नवीन योजना विद्यार्थ्यांना पटवून दिल्या. शाळांना ग्रंथालय, संगणक, वॉटर प्युरिफायर इ. मदत करणार तसेच बिमाग्राम योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी किमान १०० विमा पॉलिसी काढल्यास शौचालये, हापसा हातपंपच्या स्वरूपात मदत करते. मानवाची शिक्षण व आरोग्य ही मूलभूत गरज भागविण्यासाठी पॉलिसी ही गरजेची आहे, असे प्रतिपादन काळे यांनी केले. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांंचा चषक देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गौरव ठाकरे, प्राथमिक मुख्याध्यापक डी.आर. गायकवाड व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गौरवार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.पी. जाधव तर मुख्याध्यापक भुसाळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.(वार्ताहर)
भनवड आश्रमशाळेत गुणगौरव सोहळा
By admin | Published: October 29, 2016 12:35 AM