कोकणगाव : पिकविलेल्या मालाची विक्र ी थांबली असून शेतकरी हतबल झाले आह.े यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षे पिक वाया गेले होते. द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करून मोठ्या संकटातून द्राक्षबागा वाचलेल्या होत्या पण हाती आलेले पीक विक्र ीसाठी आलेले असताना त्यात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे देशभरात सुरू असलेला संचारबंदीचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या बागेत माल असताना मजूर काम सोडून निघून गेले, एक्स्पोर्ट बंद झाल्यामुळे बेदाणे व लोकल व्यापारी ७ ते १२ रु पये किलो द्राक्षे खरेदी करू लागली. त्यामुळेद्राक्ष शेतीधोक्यात आली आहे.झाडावर राहिलेली द्राक्षे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. बºयाच शेतकºयांनी द्राक्ष तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत. शेतकरी बेदाणा तयार करत असून यावर्षी बेदाण्याचे प्रमाण वाढणार आहे, त्याचाही परिणाम बाजार भावावर होणार आहे.प्रतिक्रि या .....सध्या द्राक्षाना ७ ते १२ रु पये भाव मिळत असुन द्राक्ष पिकविण्यासाठी २५ ते ३० रु पये खर्च येतो सध्या तो भाव मिळत नसून यापुढेही येणाºया वर्षासाठीही एवढाच खर्च करावा लागणार आहे. या संकटातून तो सावरणे अशक्य आहे. येणाºया वर्षा साठी बँक तसेच सोसायटी, जिल्हा बँक यांनी नवीन बिनव्याजी कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे.- सुनील बोरस्ते, द्राक्ष उत्पादक शेतकरी, साकोरे (मिग)दर वर्षी कोणत्या न कोणत्या संकटाला सामोरे जावे लागतेच, कोणतेही संकट आले कि ते शेतकºयांच्या मुळावर येते. त्यामुळे शेती व्यावसाय धोक्यात आला आहे. सध्या कोरोना सारख्या भयंकर आजाराचा फटका शेतकरी व द्राक्ष बागांना बसला आहे. मजुर, व्यापारी नसल्यामुळे द्राक्षबागा तशाच असल्याने मण्यांमध्ये पूर्ण साखर उतरु न द्राक्ष खराब होत चालली आहे.- केशवराव मोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कोकणंगाव. (फोटो १९ कोकणगाव)
द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 4:14 PM
कोकणगाव : पिकविलेल्या मालाची विक्र ी थांबली असून शेतकरी हतबल झाले आह.े यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षे पिक वाया गेले होते. द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करून मोठ्या संकटातून द्राक्षबागा वाचलेल्या होत्या पण हाती आलेले पीक विक्र ीसाठी आलेले असताना त्यात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे देशभरात सुरू असलेला संचारबंदीचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
ठळक मुद्देकोकणगाव, साकोरे मिग परिसरातील ४० टक्के निर्यातक्षम माल शिल्लक