शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

राज ठाकरे यांना मोठा दिलासा; जळगाव न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 7:10 PM

Raj Thackeray Acquitted : या गुन्हयाच्याकामी पोलिसांनी १३ जानेवारी २००९ रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले.

जळगाव - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे रेल्वेत मराठी माणसांची भरती करण्यात यावी. यासाठी केलेल्या आदोलन केल्यामुळे त्यांना २१ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच तारखेला जळगाव येथे मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेत्वृत्वाखाली वकील जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट परिसरात डिजीटल बॅनरवर फाशी दया लालू आधी जोडे मारा साल्याला " असे लिहून घोषणाबाजी केली. त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदरचे आंदोलन दिसले असता आणि आंदोलन करणारे यांना पोलिस दिसले असता त्या ठिकाणी पळापळ होऊन वाहनांचे नुकसान झाले म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्टेबल श्यामकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासह इतरांचे विरूध्द २१ ऑक्टोबर २००८ रोजी भा.दं.वि.कलम १४३, १४७,४२७,१०९, मुंबई पोलिस ऍक्टचे कलम १३५ तसेच महाराष्ट्र डॅमेज ऍक्टचे कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

या गुन्हयाच्याकामी पोलिसांनी १३ जानेवारी २००९ रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले. या खटल्याचे कामी राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींना समन्सची बजावणी झाली. नंतर न्यायालयात ६ एप्रिल २०१३ रोजी सुनावणी झाली असता राज ठाकरे आणि इतर आरोपी यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. त्यावेळी राज ठाकरे आणि  इतरांसाठी वकील केतन जे. ढाके यांनी काम पाहिले होते. या खटल्याच्याकामी राज ठाकरे यांना वैयक्तीक हजेरीपासून सूट देण्यात आलेली होती. पुढे या खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाले.या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीसह इतर पोलीस कॉन्टेबल पंच व वाहनांचे नुकसान झालेले नागरिकांची साक्ष घेण्यात आल्या. एकंदरीत न्यायालयासमोर आलेला पुरावा पाहता व खटल्याचे कामी आरोपी पक्षाकडून केलेला युक्तीवाद लक्षात घेता आज प्रथम वर्ग न्यायंदडधिकारी जळगाव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, वकील जमील देशंपाडे, प्रेमानंद जाधव, यासीन रज्जाक यांची या गुन्हयातून निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याच्याकामी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतरांसाठी वकील.संदीप गोकुळ पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashikनाशिकPoliceपोलिसCourtन्यायालय