शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

ग्रीन कॉरिडोर : नाशिकच्या मेंदूमृत युवकाच्या अवयवांमुळे थांबणार ‘त्यांची’ मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:56 PM

रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात दाखल झालेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) हे एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते.

ठळक मुद्देदोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयवदान‘ग्रीन कॉरिडोर’द्वारे अवयव बाणेर, पुणे येथील रूग्णालयांत

नाशिक : दिंडोरीरोडवर झालेल्या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने उपचारादरम्यान एका ३७ वर्षीय युवकाला डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. मेंदू मृत झाल्यानंतर जीवन संपुष्टात येते, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना पटवून देत अवयवदान चळवळीविषयी माहिती दिली. मुळचे नेपाळ येथील रहिवासी असलेल्या शर्मा कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने त्या युवकाच्या अवयांवमुळे चौघा गरजू रूग्णांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबणार आहे. या युवकाचे अवयव शनिवारी (दि.१८) ‘ग्रीन कॉरिडोर’द्वारे बाणेर, पुणे येथील रूग्णालयांत पोहचविण्यात आले.रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात दाखल झालेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) हे एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते. नोकरी आटोपून दिंडोरीरोडवरून दुचाकीने घरी परतत असताना शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात मिलन यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गंगापूररोडवरील ऋषिकेश रूग्णालयात त्यांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. डॉक्टर भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व त्यांच्या पत्नी मीनल शर्मा व कुटुंबातील अन्य सदस्यांना पटवून दिले. यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तत्काळ याबाबत विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (झेडटीसीसी) रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली. केंद्राकडून बाणेर येथील ज्यूपिटर व पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात गरजू रूग्ण असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार दोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयव वरील रूग्णालयांमध्ये शनिवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास शहर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या ‘ग्रीन कॉरिडोर’मधून पोहचविण्यात आले. सुमारे तीन तासांत २२० किलोमीटर अंतर कापत रूग्णवाहिका (एम.एच.०४ जीपी २२२९) बाणेरला रूग्णालयात पोहचली.असा होता ‘ग्रीन कॉरिडोर’गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौक, जुना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, वनविभाग सिग्नल, मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक सिग्नलवरून कालिकामंदीरमार्गे, मुंबईनाका व तेथून महामार्गाने वडाळानाका, द्वारका, काठेगल्ली, दत्तमंदीर, चेहडीमार्गे सिन्नर, नांदूरशिंगोटेपासून पुढे नाशिकफाट्यावरून बाणेर. शहर वाहतूक पोलिसांनी चिंचोळी फाट्यापर्यंत कॉरिडोरची धुरा सांभाळून पुढे ग्रामिण पोलिसांकडे जबाबदारी सोपविल्याचे उपनिरिक्षक सुजीत मुंढे यांनी सांगितले. वरील प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले होते. 

टॅग्स :Organ donationअवयव दानNashikनाशिकHealthआरोग्यtraffic policeवाहतूक पोलीस