खामखेडा : मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो की नाही यांची चिंता पडली आहे.गेल्या वर्षी खामखेडा परिसरात सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिने दांडी मारल्याने पाहिजे त्याप्रमाणात पिके आली नाही. ऐन कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाºयाचे प्रमाण कमी झाले. शेतकºयांकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावारांना पुरेल एवढा चारा असतो. मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर सर्वत्र हिरवा चारा शिवारात उपलब्ध होत असतो.परंतु चालू वर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांकडील चारा एप्रिल महिन्यात संपला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमाराची वेळ आली आहे. तसेच दरवर्षी परतीचा पाऊस पडत असे. त्यामुळे विहिरीचे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत ठिकून राहत असे. पाण्यामुळे ज्वारीचा चारा मे महिन्यापर्यंत जनावरांसाठी पुरत असे. या पाण्यावर शेतकरी जनावरांसाठी हिरव्या चाºयासाठी भुईमूग, ज्वारी, मका यांची पेरणी करीत असे. आणि हा चारा नेमका यावेळेस या वेळेत जनावरांना खाण्यासाठी उपलब्ध होत असे. मात्र चालू वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे काही अल्पशा शेतकºयांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याचे चाºयाचे भाव गगनाला भिडले आहे.साधारण एक ओळीचे भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रक्टर ट्रॉंलीभर चारा येतो. एका वीस गुंंंठे तुकड्यात साधारण पाच ओळी असता आणि या एका एका तुकड्याची किंमत वीस हजार रु पयापर्यंत आहे. काही तुरळक शेतकºयांकडे उसाचा चारा आहे. या उसाच्या एका सरीचा भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात.) हजार ते पंधराशे रुपये झाला आहे.उसाच्या एका सरित साधारण एक बैलगाडी भर चार येतो. त्यामुळे सततच्या पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयाला आपले महगडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाºयाचा भाव गगनाला भिडले आहेत.
हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:11 PM
मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो की नाही यांची चिंता पडली आहे.
ठळक मुद्देविकतच्या चाºयावर जनावरांना पोसणे अवघड