दिंडोरी : तालुक्यातील पोलीसपाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला असल्याने गेल्या १२ ते १३ वर्षांपासून दिंडोरी व पेठ तालुक्यातील पोलीसपाटील पदाची भरती झालेली नव्हती; परंतु शासनाच्या धोरणानुसार पोलीसपाटील पदाची भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे.पोलीसपाटील हा शासन व गावाचा एकमेव दुवा असून, शासन स्तरावर गावातील भांडणतंटे मिटवत असतो. खेड्या-पाड्यावर पोलीस-पाटलाची नितांत गरज असल्याने महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील संघाचे उपाध्यक्ष चिंतामण मोरे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी तहसीलदार कार्यालयातील कुळ कायदा शाखेशी संपर्क करावा. मंजूर झालेल्या गावांमध्ये ठेपणपाडा, नळवाडपाडा, नळवाडी, चारोसे, हातनोरे, मडकीजांब, जांबुडके, रासेगाव, आशेवाडी, धावूर, कोचरगाव, तिल्लोळी, आंबेगण, गोळशी, महाजे, कवडासर, चिमणपाडा, देवघर, जोरणपाडा, जोरण, कादवा म्हाळुंगी, चौसाळे, खडकसुकेणे, शिवारपाडा, पिंपळणारे, वलखेड, रवळगाव, वांजोळे, वारे, अवनखेड, कुर्णोली, म्हेळुस्के , वरखेडा, विळवंडी, कोशिंबे आदि गावांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)
पोलीसपाटील पदाच्या भरतीस हिरवा कंदील
By admin | Published: February 20, 2016 9:27 PM