कळवण : कळवण-सुरगाणा विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करु न रस्त्यांची विशेष दुरु स्ती करण्यासाठी ३५ कोटी ६५ लाख रु पयांचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर केला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदिवासी भागातील रस्ते दुरु स्तीसाठी खास बाब म्हणून मंजुरी देण्याची सूचना करु न प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आमदार जे.पी. गावित यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची दुरु स्ती करावी अशी वारंवार मागणी मतदार संघातील जनतेकडून होत असल्याने आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सन २०१८ मध्ये रस्ते दुरु स्ती कार्यक्र मात कळवण व सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश करून निधी उपलब्ध करु न देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कळवण तालुक्यातील ११ रस्त्यासाठी १९ कोटी ८० लाख रु पयांचा तर सुरगाणा तालुक्याच्या ९ रस्त्यांसाठी १५ कोटी ८५ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करु न त्यात रस्ते दुरु स्ती कामांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी रस्ते दुरु स्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याने येत्या काळात सर्वच रस्त्यांची दुरु स्ती होईल अशी माहिती आमदार गावित यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समीतीचे माजी सभापती शैलेश पवार, माकपचे तालुका सरचिटणीस हेमंत पाटील , माजी सभापती काशिनाथ गायकवाड उपस्थित होते.
आदिवासी भागातील रस्ते दुरुस्तीला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:36 PM
जे.पी. गावित : ३५ कोटी रु पयांचा प्रस्ताव सादर
ठळक मुद्देसन २०१८ मध्ये रस्ते दुरु स्ती कार्यक्र मात कळवण व सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश करून निधी उपलब्ध करु न देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.