सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावल्यासंदर्भात या कालव्याच्या लाभक्षेत्रातील वीस गावांच्या शेतकर्यांची सोमवारी धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.याच बैठकीत शेतकर्यांसमोर हरणबारी उजव्या कालव्याच्या कामाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करून प्रत्यक्ष काम आॅक्टोबर अखेरपर्यंत सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी सबंधित यंत्रणांना दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ.सुभाष भामरे यांनी सिंचन प्रकल्प प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन बागलाण वासियांना दिलेले होते.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत बागलाण तालुक्यातील तळवाडे एक्सप्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक 8,सटाणा शहरासाठी 55 कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना यापूर्वीच मार्गी लावली आहेत.मात्र हरणबारी उजव्या कालव्याला आघाडी सरकारने हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारल्याने या कालव्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात डॉ.भामरे यांनी हरणबारी उजव्या कालव्यासाठी वाघंबा व साल्हेर वळणयोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता करून उजवा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा खोडून काढत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर या कालव्यासंदर्भात पाठपुरावा करून हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावले आहे.
हरणबारी उजव्या कालव्याच्या प्रलंबित कामाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 6:25 PM
सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णयशेतकऱ्यांच्या आशा पल्लवित