सातपूर : गेल्या महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल केले असून, त्यामुळे बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दोन दिवसांत परवानगीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर उद्योग सुरू होऊ शकतील.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या महिन्यात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित केल्याने नाशिकमधील सुमारे चार हजार उद्योग बंद आहेत. आता ते सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने गेल्या दोन दिवसांत तेराशे उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. फक्त ग्रामीण भागातील उद्योग सुरू होतील, असे सोमवारी सांगण्यात आले होते. तर सातपूर, अंबड येथील उद्योगही सुरू करता येतील, असे मंगळवारी सांगण्यात आल्याने मालेगाव वगळता जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग पूर्ववत सुरू होणार आहेत. निमाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून ते १४ एप्रिल पर्यंत केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केल्याने उद्योगधंदे पूर्णपणे बंद ठेवून कामगारांना सुटी देण्यात आली होती. १४ एप्रिल रोजी पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. परंतु २० एप्रिलनंतर आढावा घेऊन काही ठिकाणी शिथिलता आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास सोमवारी परवानगी देण्यात आल्याने आॅनलाइन परवानगी घेण्यास सुरु वात झाली होती. तर मंगळवारी (दि. २१) जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर या आदेशानुसार (जाहीर केलेल्या कॅन्टोन्मेंट एरिया म्हणजेच बाधित रुग्णाच्या घरापासून पाचशे मीटर सील केलेले क्षेत्र वगळता) सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू होण्यास मान्यता मिळाली आहे. सदरच्या आदेशाची माहिती मिळाल्याने सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत जिल्ह्यातील १३०० उद्योगांनी परवानगीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र उद्योग सुरू करताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करणे उद्योगांना बंधनकारक करण्यात आले आहे.अन्यथा परवानगी रद्द करणारकोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या क्षेत्रात उद्योग असेल तर तो सुरू करता येणार नाही आणि तेथील कामगारही कामावर घेता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनेला उद्योग सुरू करण्यासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात येणार आहे.
सातपूर-अंबड भागातील उद्योगांना हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 2:07 AM
गेल्या महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल केले असून, त्यामुळे बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दोन दिवसांत परवानगीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर उद्योग सुरू होऊ शकतील.
ठळक मुद्देनिर्बंध शिथिल : प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांना मनाई