पंचवटी : पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कमीत कमी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया सर्वच फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, ग्वाल्हेर या परिसरातून हिरवा वाटाणा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने त्याचा परिणाम अन्य फळभाज्यांच्या बाजारभावावर झाला आहे. बाजार समितीत वांगी, कारले, काकडी, भोपळा, गिलका, दोडके शिमला मीरची असा फळभाज्यांचा माल विक्रीसाठी दाखल होत आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून बाजारात वाटाण्याची विक्रमी आवक होऊ लागल्याने त्याचा परिणाम अन्य फळभाज्यांवर झाला आहे. बाजार समितीत हिरवा वाटाणा ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, तर किरकोळ बाजारात अन्य फळभाज्याही ६० रुपये दराने विक्री होत आहेत. शिमला, दोडका, कारली, भोपळा हा शेतमाल वर्षभर असतो, तर वाटाणा केवळ हिवाळ्यात येत असल्याने सध्या ग्राहकांकडून वाटाणा खरेदीवर भर दिला जात आहे. वाटाण्याची आवक वाढलेली असल्याने त्यातच ४० रुपये किलो बाजारभाव असल्याने अन्य फळभाज्यांपेक्षा वाटाणा स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांकडून वाटाण्याला मागणी वाढली आहे. बाजार समितीत मंगळवारी (दि. २०) भोपळा एक ते दोन रुपये नग या दराने विक्री झाला तर काकडीला १०ते १२ रुपये किलो, शिमला मारची २५ रुपये, वांगे २० रुपये, कारले २५ रुपये, गिलके बारा ते पंधरा रुपये किलो असा बाजारभाव मिळाल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.वाटाण्यामुळेच बाजारभाव कोसळले बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश तसेच अन्य भागांतून हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत आहे. अन्य फळभाज्यांपेक्षा वाटाणा स्वस्त मिळत आहे. त्यातच वाटाणा हा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे, तर अन्य फळभाज्या वर्षभर मिळतात. त्यामुळे ग्राहक वाटाणा खरेदीवर भर देत असल्याने अन्य फळभाज्यांचे भाव घसरले आहेत.
हिरवा वाटाणा बाजारात दाखल; आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:49 PM
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कमीत कमी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया सर्वच फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, ग्वाल्हेर या परिसरातून हिरवा वाटाणा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने त्याचा परिणाम अन्य फळभाज्यांच्या बाजारभावावर झाला आहे.
ठळक मुद्देदरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान बाजार समितीत हिरवा वाटाणा ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीवाटाण्यामुळेच बाजारभाव कोसळले