नाशिक : संत गाडगे महाराजांचे कार्य समाजास आजही प्रेरणादायी आहे. गाडगे महाराजांनी समाजकार्याचा जो आदर्श समाजापुढे ठेवला तोच आदर्श आजही आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुरेंद्र पुजारी यांनी केले.गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या वतीने अंध-अपंगांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी सुमारे २०० गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८ वाजता नगरसेवक शाहू खैरे, राजेंद्र बागुल यांच्या हस्ते मेनरोड येथील गाडगे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच धर्मशाळेत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी माजी क्रीडा अधिकारी शैलजा सानप, श्रीक ांत येवलेकर, सुरेंद्र पुजारी, प्रीती नेरकर, शंकर ठाकरे, बाळासाहेब वाघ, नागेश लोंदे, अशोक पोटे, तुळशीदास चराटे, जितेंद्र ठाकरे, ओम लोंदे, आत्माराम काळे, अक्षदा पवार आदीसह पदाधिकाऱ्यारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक कुणाल देशमुख यांनी केले.
गाडगे महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:04 AM
संत गाडगे महाराजांचे कार्य समाजास आजही प्रेरणादायी आहे. गाडगे महाराजांनी समाजकार्याचा जो आदर्श समाजापुढे ठेवला तोच आदर्श आजही आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुरेंद्र पुजारी यांनी केले.
ठळक मुद्देप्रतिमापूजन : गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या वतीने अन्नदान