थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२१ वी जयंतीनिमित्त संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यासारखा अन्य कोणी अपराजित योद्धा झालेला नाही, असे गौरवोद्गार संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी काढले. महापराक्रमी बाजीराव पेशवे यांचे युद्ध कौशल्य, धडाडी हे सदैव अभ्यासण्यासारखे आहे, त्यांचे पराक्रमाचे स्मरण सदैव ठेवून धडाडीने संघर्ष करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे, असे विचार संस्था उपाध्यक्ष ॲड. भानुदास शौचे यांनी व्यक्त केले, तसेच नेताजीचे स्मरण करून विनम्र अभिवादन केले. संस्था कार्यवाह अनिल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर बांधकाम समिती प्रमुख दिलीप शुक्ल यांनी आभार मानले. यावेळी शुयमा ब्राह्मण संस्था, बहुभाषिक ब्राह्मण संस्था व समाजातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी धनंजय पुजारी, प्रमोद मुळे, चंद्रशेखर गायधनी, तसेच सतीश जोशी, उदय जोशी, रत्नाकर जोशी, दीपक कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, शांता जाधव, गजानन जाधव उपस्थित होते.
फोटो
१९बाजीराव