येवला : लोककवी वामनदादा कर्डक यांचा १७ व्या स्मृती दिन लोकशाहिर दिना निमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक आयोजित युट्युब ऑनलाईन निमंत्रितांचे कोरोना लोकजागृती काव्य, गीत, गझल संमेलनाद्वारे अनोखे अभिवादन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप हे होते. उद्घाटन लोककवी हरेंद्र जाधव साहित्य संस्था नवी मुंबईच्या अध्यक्ष तारका जाधव यांनी केले.वामनदादा कर्डक यांनी सामाजिक प्रबोधन परिवर्तनाचा वसा घेऊन मानवी मूल्यांच्या व न्याय हक्काचा लढा आपल्या साहित्य प्रतिभेतून लोकांसमोर मांडला तोच संविधानिक कारवा लोकरंजनातून लोकप्रबोधन करीत तरुणांच्या ओठी आणि हाती मानवतेच गाणं रुजविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करत असल्याचे मत यावेळी प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.संमेलनाध्यक्ष नंदेश उमप यांनी कविता सादर केली.अनिल कोशे (यवतमाळ), नुमान शेख (लासलगाव), सुनीता इंगळे (मूर्तिजापूर), प्रशांत धिवंदे, मकरंद जाधव, अशोक भालेराव (नाशिक), बबन सरवदे (मुंबई), मधुकर जाधव (सिन्नर), निलेश पवार (भुसावळ), रमेश बुरबुरे (गडचिरोली)भास्कर अमृतसागर (धुळे),सोनाली सोनटक्के (यवतमाळ) यांनी आपल्या गझल, कविता व गीते सादर केली. प्रा. राहुल सुर्यवंशी (मुंबई) यांनी तांत्रिक सह्यय तर सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ यांनी केले.नंदेश उमप यांच्या गाण्याने संमेलनाचा समारोप केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक दिनेश वाघ,ॲड. अरुण दोंदे, वैभव कर्डक, वनिता सरोदे-पगारे, ॲड. शरद कोकाटे, अतुल डांगळे, दीपक शिंदे, सागर पगारे, कुलदीप दिवेकर, शैलेंद्र वाघ, सागर पगारे, सुरेश लोखंडे, प्रवीण कर्डक, सविता गजभिये,भारती बागुल, रामदास कुऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.