नाशिकरोड : सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या ७३३व्या पुण्यतिथीनिमित्त जेलरोड व रेजिमेंटल प्लाझा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जेलरोड इंगळेनगर येथे श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार हेमंत गोडसे, महाराष्ट राज्य लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष दिलीप शहाणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रशांत दिवे, शरद मोरे, माजी नगरसेवक संजय भालेराव, सुनील बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश नागरे यांनी केले. यावेळी किरण डहाळे, चंद्रकांत नागरे, महेश नागरे, राजेश चिंतामणी, सचिन जाधव, कुंदन शहाणे, सागर नागरे, सचिन शहाणे, प्रवीण शहाणे, भुपेश अहिरराव, आनंद माळवे आदी उपस्थित होते.जेलरोड येथील कार्यक्रमात पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक विक्रम खरोटे यांनी केले. यावेळी नगरसेविका मीराबाई हांडगे, रंजना बोराडे, दिनकर आढाव, मुकुंद आढाव, जगदीश गोडसे, दिलीप शहाणे, राजेंद्र दुसाने, विनोद खरोटे आदी उपस्थित होते.बिटको पॉइंट रेजिमेंटल प्लाझा येथे बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने संत श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गिरीश मुदलियार, विशाल कुलथे, संजय पितळे आदी उपस्थित होते.जेलरोड येथेही कार्यक्रमजेलरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सुवर्णकार समाज नाशिकरोडच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले.शहरातही विविध कार्यक्रमसंत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर व परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले. नाशिक शहर तसेच पंचवटी, सिडको, इंदिरानगर, सातपूर, आडगाव, गंगापूररोड, मखमलाबाद आदि विविध ठिकाणी प्रतिमा पूजन करून विविध वक्त्यांनी त्यांच्या कार्याची महती विषद केली. या कार्यक्रमांना परिसरातील सुवर्णकार समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:37 PM