शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

गुरु-शिष्य भेटीचा मंगलमय सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:32 PM

कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात वाहून घ्या, नामस्मरणाशिवाय मुक्तीची वाट सापडणार नाही, असा संदेश संतश्री सखाराम महाराज अमळनेरकर यांनी दिला.

ठळक मुद्देमनमाड । सखाराम महाराज दिंडीचे भाविकांकडून स्वागत

मनमाड : कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात वाहून घ्या, नामस्मरणाशिवाय मुक्तीची वाट सापडणार नाही, असा संदेश संतश्री सखाराम महाराज अमळनेरकर यांनी दिला.पंढरपूर ते अमळनेर दिंडीचे सालाबादाप्रमाणे मनमाड शहरात आगमन झाले. यावेळी अनेक भाविकांनी दर्शनाचालाभ घेतला. ‘सखाराम महाराज की जय’च्या जयघोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गुरु-शिष्य भेटीच्या या मंगलमयसोहळ्यामध्ये असंख्य भाविक सहभागी झाले होते.श्री संत सखाराम महाराज यांचे उत्तराधिकारी व संस्थानचे अकरावे संत श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या दिंडीचे मनमाड शहरात आगमन झाले. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून रोषणाई करण्यात आली होेती. येथील किशोर नावरकर, विनोद देशमानकर, मुन्ना अहिरराव, प्रभाकर जोशी, हरिभाऊ ब्राह्मणकर, प्रशांत जोशी, गिरीश जोशी यांच्याकडे पानसुपारीच्या कार्यक्रमात असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दिंडीमध्ये पंढरपूर येथून आलेल्या पादुकांचे भाविकांनी मनोभावे पूजन केले. दत्तोपासक मंडळाने प्रासादिक भजन सादर केले. भगवतगीतेच्या अध्यायाबरोबरच विष्णू सहस्रनामाचे महत्त्व त्यांनी विशद केले. गुरु-शिष्य भेटीचा अनोखा सोहळा मनमाडकरांनी अनुभवला. महिला मंडळाने भजने सादरकेली. यावेळी प्रसाद नाईक, किशोर नावरकर, गोपाल नागरे, सुनील खताळ, राजेंद्र जगताप, अमूल्य जोशी, अनिल खताळ आदी भाविक उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे