डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड यांनी २ मार्च १९३० ते १३ ऑक्टोबर १९३५ या कालावधीत शेकडो कार्यकर्त्यांसह काळाराम मंदिराबाहेर पाच वर्ष अविरत सत्याग्रह केला होता. त्यानंतर मंदिरात दलित बांधवांना प्रवेश मिळाला होता. या सत्याग्रह सुरु झालेल्या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. २) रोजी सकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर कीर्तीमान शिलालेख येथे सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भाजप, विविध संस्थेचे कार्यकर्ते, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी, आदींनी आदरांजली वाहिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशांत हिरे, प्रा. कुणाल वाघ, प्रा. माधव नकोसे, प्रज्ञा प्रबोधिनी, नामदेव हिरे, मदन निकम, गिरीश मोहिते, कुंदन खरे, कैलास हादगे, शालिनी ठाकरे, बार्टीचे समतादूत रुपाली आढाव, विशाल पाटील, भीमसेन चव्हाण, कैलास शार्दुल, देवीदास तेजाळे उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन करण्यात आले. यावेळी भन्ते सुगत यांनी बौध्द वंदना करून कोनशिलेला पुष्पहार अर्पण केला. अभिवादन सोहळ्यास अमोल पगारे, पवन क्षीरसागर, नारायण गायकवाड, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.
(फोटो ०२ )- श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करताना भन्ते सुगत, प्रकाश लोंढे, नारायण गायकवाड, दीक्षा लोंढे आदी.