सुरुवातीला उपसरपंच आत्माराम दाते व मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ऑनलाईन भाषणे केली.
शिक्षिका विजया पगार, शीतल पगार, विजय जगतापसुचित्रा देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील ग्र॓ंथाचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच आत्माराम दाते यांनी ऑनलाईन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला लाखलगाव ग्रामपंचायतचे सदस्य कैलास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कांडेकर, नीता कदम, शीतल पगार, सुचित्रा मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप समृद्धी जगताप हिचा ‘माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लावलं रमानं’ या गाण्याने करण्यात आला.
फोटो- लाखलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाईन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना उपसरपंच आत्माराम दाते, मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे, विजय जगताप व मान्यवर. तसेच ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमातून सहभागी झालेले विद्यार्थी.
Attachments area
===Photopath===
140421\14nsk_55_14042021_13.jpg
===Caption===
लाखलगाव शाळा