जनसेवा मंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास आदिनाथ शिंदे, किसन शिंदे ,शंकर आमले,बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. उपसरपंच शेखर कर्डिले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीला असे साथीदार होते? म्हणूनच स्वराज्य अबाधित राहून वाढले. कोंढाणा किल्ल्यावरील मालुसरे यांच्या बलिदानानंतर शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’ अशा शब्दात शोक व्यक्त केला होता. यावरुनच स्वराज्यात तानाजी यांचे स्थान किती महत्त्वाचे होते? याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो असे प्रतिपादन आदिनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी अर्जुन आव्हाड, अरुण शिंदे, चांगदेव शिंदे, अक्षय गोसावी, रावसाहेब शिंदे, संजय काकड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
040221\04nsk_10_04022021_13.jpg
===Caption===
ठाणगाव येथे जनसेवा मंडळाच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यकर्ते.