पिंपळगाव बसवंत : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २१५व्या जयंतीनिमित्त जानोरी परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले.प्रारंभी जानोरी येथील कार्गो गेटजवळील राघोजी भांगरे चौकात दीपप्रज्वलनाने महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदिवासी समाजाचे आराध्यदैवत राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आदिवासी शक्ती सेना संघटनेच्या माध्यमातून रक्तदानातून २१५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच सुरगाणा तालुक्यातील येथील माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या श्रद्धा सपाटे व रविना डंबाळे या आदिवासी भगिनींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.आदिवासी शक्ती संघटनेमार्फत ओझर, गारेकरवाडी, रामजीनगर, श्रमिकनगर, शिरसगाव चौकी, चंबळ खोरे वस्ती, भगत चौक, शिवाजीनगर जानोरी, राघोजी भांगरे नगर, नांदुर्डी आदी ठिकाणी राघोजी भांगरे यांना अभिवादन करून इतिहासाला उजाळा देण्यात आला. गोरगरीब मुलांच्या शिक्षणास ब्रेक लागू नये यासाठी पुस्तके व वह्या, पेन वाटप करण्यात आले.यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, नाशिक मनपा सातपूरचे माजी सभापती योगेश शेवरे, दिंडोरी तालुका सोमनाथ वतार, वैशाली पवार, संदीप गांगुर्डे, व्याख्याते नेहरे, दीपक मोरे, सुरेश ब्राह्मणे, बन्सी कोकतारे, गोरख पावटे, कैलास सूर्यवंशी, सचिन बागुल, किरण कुंदे, दीपक गवारे, सचिन जाधव, सतीश उंबरसाडे, वसंत वलारे. स्वप्निल बदादे, केशव गांगुर्डे, प्रकाश मोंढे, रोशन कडाळे, प्रसाद गांगुर्डे, निवृत्ती आचारी, संदीप कोकाटे, विकी साळुंके, नीलेश मोरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो ०९ पिंपळगाव १),२)जानोरी येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करताना अर्जुन गांगुर्डे, योगेश शेवरे, सोमनाथ वतार व नाना डंबाळे समाजबांधव आदी.
जानोरी येथे राघोजी भांगरे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 11:51 PM
पिंपळगाव बसवंत : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २१५व्या जयंतीनिमित्त जानोरी परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले.
ठळक मुद्दे माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या श्रद्धा सपाटे व रविना डंबाळे या आदिवासी भगिनींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.