निफाड : तालुक्यातील खडक माळेगाव येथे सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र माउली, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्र सेवा दलाचे संघटक हसनभाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल मच्छींद्र हिरे यांनी केले. याप्रसंगी हसनभाई पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला किरण रायते, श्याम रायते, संपतराव मोहिते, दीपाली व्यवहारे यासह वाचक व बालवाचक उपस्थित होते.निफाड येथील वैनतेय विद्यालयातही साने गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे , बा. बा. गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य वाघ यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बा. बा. गुंजाळ यांनी साने गुरुजी यांचे कार्य व माहिती सांगितली. उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी साने गुरुजी यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तीपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
निफाड परिसरात साने गुरुजी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 9:38 PM
निफाड : तालुक्यातील खडक माळेगाव येथे सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र माउली, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
ठळक मुद्देवैनतेय विद्यालयातही साने गुरुजी यांना अभिवादन