भाऊसाहेब जगताप साहेब यांचा हस्ते शाळेतील शिक्षिका विजया पगार, नीता कदम, शितल पगार, सुचित्रा मराठे यांचा, तसेच अंगणवाडीसेविका कुसुम कांडेकर, आशा चौधरी, बेबी जाधव आणि अंगणवाडी मदतनीस सुनंदा बर्वे, कौशल्या जाधव, मंगला जाधव यांचा व स्वंयसेविका शाळेचा माजी विद्यार्थिनी योगिता जाधव, शारदा गांगुड, सोनाली गांगुड, तसेच ननही कली शिक्षिका संध्या रत्नपारखी, सीमा पेंढारी, यांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षिका नीता कदम यांनी सावित्रीबाई फुले यांचा भाषणातील प्रसंग समजावून दिले.
जगताप साहेब यांनी उपक्रमशील शिक्षक विजय जगताप यांचा वाढदिवसानिमित्त गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विजय जगताप यांनी शाळेला दोन खुर्च्या भेट दिल्या.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विजया पगार, विजय जगताप, नीता कदम, शितल पगार, सुचित्रा मराठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले, तर आभार सुचित्रा मराठे यांनी मानले. (फोटो ०३ लाखलगाव)