शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सागरा प्राण तळमळला़ गीतातून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:37 PM

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़

नाशिक : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़भगूर येथील सावरकरांच्या जन्मभूमी स्मारकात चारुदत्त दीक्षित यांचा बागेश्री निर्मित ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी खासदार हेमंत गोडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते़ प्रारंभी बागेश्री वाद्यवृंदातील बालगायिका कलावंत जान्हवी पाटील व श्रेया गायकवाड यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला़ राष्टÑप्रेम जागृत करणारी गाणी गायक राजेंद्र सराफ, दीपक दीक्षित यांनी सादर केली़ त्यांना जान्हवी पाटील, कल्पना व्यवहारे, उज्ज्वल शिंदे, सुवर्णा पाटील, श्रेया गायकवाड यांनी सहगायनाची सुरेख साथ केली़ निर्मिती संकल्पना चारुदत्त दीक्षित यांची होती़ निवेदिका वृषाली घोलप यांनी सावरकरांच्या जीवन प्रवासातील प्रसंग कथन केले़विविध गीतांना चारुदत्त दीक्षित (संवादिनी), अभिजित वैद्य (तबला), ऋषिकेश गायकवाड (तालवाद्ये) यांनी साथ संगत केली़ याप्रसंगी एकनाथ शेटे, डॉ़ मृत्युंजय कापसे, प्रतापराव गायकवाड, प्रफुल्ल चव्हाण, विलास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते़भगूरला विविध कार्यक्रमयेथील नाशिक एज्युकेशन संचलित ति. झं. विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ, सुगंधा समिती भगूर शाखेच्या वतीने मुलींसाठी सॅनेटरी नॅपकिन (व्हेंडिंग) मशीन मोफत उपलब्ध करून दिले. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. भगूर शाखेच्या वतीने प्रकल्प प्रमुख नलिनी भट्टड यांनी या उपक्र माची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका प्रियंका निकम, मंडळाच्या कोषाध्यक्षा सुवर्णा मानधने, किरण लोया, प्रतिभा कासट, अलकनंदा लोया, प्रियंका निकम, अनिता लोया, लीला लाहोटी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन नरेंद्र मोहिते यांनी तर आभार शिक्षक प्रतिनिधी शिवाजी सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी अशोक लोया, संजय लाहोटी, अमोल सोनवणे, भरत भलकार, सुनील शेटे, चिमाजी सापटे, संजय भांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक