सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.महामित्र समूहाचे दत्ता वायचळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. जल-जमीन-जंगल यावर आदिवासींचा अधिकार आहे. आदिवासी हा निसर्गाच्या सान्निध्यात राहतो आणि निसर्गाला देव मानतो. आदिवासी संस्कृती जपतो. माणूस जसजसा प्रगत होत चालला आहे तसतशी निसर्गाची हानी होत आहे. औद्योगिकीकरण विकासामुळे पर्यावरणाचा ºहास होत चाललेला आहे त्यामुळे आस्तित्व धोक्यात आलं आहे. आदिवासींच्या अधिकारासाठी अनेकांना प्राणाचं बलिदान द्यावे लागले आहे. आदिवासींचं अस्तित्व अबाधित राहावा यासह निसर्गाची हानी रोखण्यासाठी आदिवासी वाचला तर निसर्ग वाचेल म्हणून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. जगात १९३ च्या वर देशांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. भारत सरकारने याची दखल घेऊन शासकीय पातळीवर जागतिक आदिवासी दिन साजरा करावा व शासकीय सुट्टी जाहीर करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. नामदेव वाजे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय मुठे, तर प्रास्ताविक रामू इदे यांनी केले. आभार विजय नवाळे यांनी मानले.
आदिवासी दिनानिमित्त सिन्नरला क्रांतिवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 7:09 PM
सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.
ठळक मुद्देक्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.