भारत विद्यालय, कॅम्प
मालेगाव : येथील भारत विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना अहिरे होत्या. त्यांच्या हस्ते प्रतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. अमृता हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निवृत्ती बडगुजर आभार बाबाजी कन्नोर यांनी मानले.
--------------------
आरबीएच कन्या विद्यालय, कॅम्प
मालेगाव : येथील आरबीएच कन्या विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानी मुख्याध्यापिका ए.जे. जोंधळे होत्या. त्यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोसयांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्या जोंधळे, उपप्राचार्या श्रीमती के.डी. पवार, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, एन.एस. शेख शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी तर आभार वैशाली पाटील यांनी मानले.
--------------------
के.बी.एच.विद्यालय कॅम्प
मालेगाव : येथील के.बी.एच.विद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्राचार्य अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार, संतोष सावंत, निवृत्ती निकम, ज्येष्ठ शिक्षक एम.आर, अहिरे, प्रवीण पाटील, आर.बी.बच्छाव, आर.डी.शेवाळे, आर.के.बोरसे उपस्थित होते. यावेळी नीता देवरे मनोहर आहिरे, राहुल शेवाळे, निखिल भामरे, अजिंक्य खचले यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले.
ग्रामपंचायत कार्यालय, झोडगे
झोडगे : येथील ग्रामपालिका कार्यालयात निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यालयात सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास परशराम गवांदे, बंटी देसले, बाळासाहेब यादव देसले, सुरेश चिंधु देसले, सतीश जाधव, भास्कर देसले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.