नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये प्रतिमापूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच विविध संस्था, संघटनांतर्फेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक आशा उमाप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षक नानासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास रंजना देवरे, स्वाती धोंडगे, शोभा मगर, योगीता सोनवणे, पंकजा शिरसाठ, नूतन देवरे, संगीता बारेसे, सारिका वडजे, शीतल शिंदे, दीपाली कोरे, सविता पेखळे, स्वाती काळे, वैशाली सोनवणे, सुवर्णा पाटील, भावना कळमकर, अंबादास पारधी, भाऊसाहेब लोखंडे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन भावना कळमकर यांनी केले.रमाबाई कन्या विद्यालयरमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राम पटाईत होते. प्रमुख पाहुणे कुणाल गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस हेमंत वाघ, डॉ. संजय जाधव, विश्वास मगर, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ आदी उपस्थित हाते. मुख्याध्यापक सरिता जोशी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी स्विटी गायकवाड, पल्लवी खंडारे, अनुष्का वाघ आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन जोपूळकर यांनी केले. कीर्ती कदम यांनी आभार मानले.केबीएच विद्यालय, पवननगरमहात्मा गांधी विद्या मंदिर पंचवटी संचलित केबीएच विद्यालय पवननगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर गीत, पोवाडे सादर केले. एस. डी. अहिरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याची माहिती सांगितली. उपमुख्याध्यापक एस. आर. सोनवणे यानी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन के. एस. सोनवने यांनी केले. यावेळी काकळीज, वाय. एस. देशमुख आदी उपस्थित होते. जीवनज्योत ज्येष्ठ नागरिक संघ, महाजननगर येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मधुकर अढांगळे, सुखलाल सुतार, एस. आर. वाडेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. संस्थेचे सचिव नंदकुमार दुसाने यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी खजिनदार तुकाराम भोळे, विष्णू कुंभार, धुडकू घरटे नंदकुमार पगारे आदी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त महामानवाच्या कार्याला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:57 AM