वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे शनिवारी महावितरण कंपणी आणि ग्रामपंचायत कार्यालय लखमापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक तक्रार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ग्रामस्थांनी अधिकाºयांसमोर विविध तक्रारींचा पाढा वाचला.याप्रसंगी दिंडोरीचे उपकार्यकारी अभियंता नारायण सोनवने व सहायक अभियंता सूगत मोरे यांनी वीज ग्राहकांच्या तक्र ारी तसेच समस्या या बद्द्ल मार्गदर्शन केले. जुन्या झालेल्या व लोंबणाºया जुनाट तारा व त्यातून घर्षण होऊन पडणारे आगीचे लोळ यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. याबाबत शेतकºयांनी अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. तसेच जुन्या जनित्रांच्या दुरूस्ती करून तत्काळ योग्य त्या ठिकाणी हलवण्या बाबत अहवाल नाशिक विभागिय अधिकाºयांकडे सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी लखमापुर चे विजतंत्री सूर्यकांत पवार, मोहन गांगोडे, दत्ता भांगरे, अनिल महाले, नितीन थेटे हे उपस्थित होते. गावठान व शिवारातील जनित्रांची पाहणी करून या बद्दल योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना संबंधीतांना देण्यात आल्या. या मेळाव्यात प्रवीण देशमुख यांनी गावात विज बिल भरना केंद्र व्हावे अशी प्रमुख मागणी केली. सर्व उपस्थित नागरिकांनी त्यास प्रतिसाद दिला. मात्र याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय पाटिल, सरपंच मंगल सोनवणे, बाबुराव सोनवणे, शांताराम सोनवणे, अशोक सोनवणे, अरूण देशमुख, दिलीप सोनवणे, निवृत्ती भगरे, अजित कड, गोविंद निमसे, अशोक मोहीते उपस्थित होते.
महावितरणचा तक्रार निवारण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:07 AM
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे शनिवारी महावितरण कंपणी आणि ग्रामपंचायत कार्यालय लखमापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक तक्रार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ग्रामस्थांनी अधिकाºयांसमोर विविध तक्रारींचा पाढा वाचला. याप्रसंगी दिंडोरीचे उपकार्यकारी अभियंता नारायण सोनवने व सहायक अभियंता सूगत मोरे यांनी वीज ग्राहकांच्या तक्र ारी तसेच समस्या या बद्द्ल मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देलखमापूर : लोंबणाºया व जुनाट झालेल्या तारांबाबत तक्रारी