या किराणा किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबुदाणा, शेंगदाणे, तेलाची पिशवी, गूळ, पोहे, साबण, खोबरे तेल, मीठ, मसाला आदी साहित्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोना रौद्र रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जणांचे व्यवसाय, नोकरी काही दिवस बंद राहणार आहेत. अशा गरजू व्यक्तींच्या मदतीला दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी धावून आले आहेत. उपक्रमासाठी पप्पू क्षत्रिय, रवींद्र कोकाटे, सचिन गुंजाळ, शाम तिवारी, रावसाहेब पावसे, सुदर्शन गोळेसर, लखन खर्डे आदी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो - १२ सिन्नर स्वामी
सिन्नर येथे गरजूंना किराणा वाटप करताना स्वामी समर्थ केंद्राचे पप्पू क्षत्रिय, रवींद्र कोकाटे, सचिन गुंजाळ, शाम तिवारी आदी.
===Photopath===
120521\12nsk_42_12052021_13.jpg
===Caption===
फोटो - १२ सिन्नर स्वामी सिन्नर येथे गरजुंना किराणा वाटप करताना स्वामी समर्थ केंद्राचे पप्पू क्षत्रिय, रवींद्र कोकाटे, सचिन गुंजाळ, शाम तिवारी आदी.