उमराणे : दिपावलीच्या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर उमराणे बाजार समितीतील कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव पुर्ववत सुरु झाले असुन लाल कांद्याचे दर तेजीतच असुन उन्हाळ कांद्याच्या दरात मात्र काहीअंशी घसरण झाल्याचे चित्र दिसुन आले.सकाळच्या सत्रात लाल कांद्यास सर्वोच्च दर २३२४ रु पये तर उन्हाळी कांद्यास सर्वोच्च दर ९७० रु पयांपर्यंत होते. तर भुसार मका मालास सर्वोच्च दर १३८२ रु पये होता. गेल्या दहा दिवसांपासून दिपावलीनिमित्त येथील बाजार समतिीचे कामकाज बंद होते. दिपावलीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरु होण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच येथील बाजार समितीच्या वतीने लिलाव सुरु होणार असल्याचे जाहिर करण्यात आल्याने येथील बाजार आवारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. लाल व उन्हाळी कांद्याचे दर काय निघतात व किती आवक होते याकडे नविन लाल कांदा उत्पादकांचे लक्ष लागुन होते. त्याअनुशंगाने सकाळच्या सत्रात लिलाव सुरु झाले तेव्हा उन्हाळी कांद्याचे दर कमीतकमी ४०१ रु पये, जास्तीतजास्त ९७० रु पये तर सरासरी ७५० रु पये होते. तर लाल कांद्याचे दर कमीतकमी ७५१ रु पये, जास्तीतजास्त २३२४ रु पये तर सरासरी १६००रु पयांपर्यंत होते.बाजार समित्यांचे कामकाज सुरूमागील सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्यांच्या दरात ३०० ते ४०० रु पयांची वाढ झाली. तर उन्हाळी कांद्यांच्या दरात १०० रु पयांची घसरण झाली आहे. भुसार मका मालाचे भाव स्थिर आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीचे कामकाज चालू बंदच्या संभ्रमावस्थेत असताना उमराणे बाजार समितीत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा होती.परंतु आवक प्रमाणात झाल्याने दरावर याचा परिणाम झाला नाही. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज सुरु झाल्यानंतर लाल कांद्याची आवक किती दिवस टिकून राहते यावरच काही शेतकºयांनी चाळींमध्ये काहीप्रमाणात साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याचे दर वाढतील की घटतील याचे चित्र स्पष्ट होणार आहे.