शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

‘जीएसटी’ सक्तीच्या विरोधातकापड विक्रेते एकवटले

By admin | Published: July 13, 2017 12:00 AM

त्रुटी दूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘यार्न’ अर्थात कापड उत्पादनावर ‘जीएसटी’ आकारला जात असताना पुन्हा कापड विक्रीवर जीएसटी आकारणे अन्यायकारक असून, कापड जीएसटीमुक्त करावा, या मागणीसाठीकापड व्यावसायिकांनी एकजूट केली आहे. यासंबंधी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.कापडसह तयार कपड्यांवरही जीएसटी लावण्यात आल्यामुळे सुरतच्या हजारो व्यावसायिकांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शहरातील कापड विके्रत्यांनीही वज्रमूठ करीत एकत्र येत जीएसटीमधून कापड व्यवसाय रद्द करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली. जीएसटीतून कापड व्यवसाय वगळावा यासाठी सरकारने व्यावसायिकांचा अंत पाहू नये, अशी मागणी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. दी नाशिक रिटेल क्लॉथ मर्चन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी बुधवारी (दि.१२) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘यान’वर १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारला जात असल्यामुळे शासनाच्या महसुलात कुठेही घट होणार नाही, तसेच ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीमध्येही कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अडथळा येणार नाही; सर्वसामान्यांची गरजवस्त्र ही सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांपैकी एक असून, शेतीनंतर सर्वाधिक महसूल देणारे क्षेत्र म्हणून कापड व्यवसायाकडे बघितले जाते. त्यामुळे कापडाला जीएसटीमधून मुक्त करून सरकारने कोट्यवधी लोकांना आणि व्यापाऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. कापड निर्मिती करणाऱ्या व्यवसायावर जीएसटी अधिकाधिक आकारावा; मात्र कापडविक्रीवर जीएसटी आकारणे योग्य नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दोन कोटींपर्यंत उलाढाल माफ असल्याने जीएसटीमध्येही तशीच तरतूद करावी.जीएसटीमधून कापड, साडी, धोतर वगळावे.

दरमहा ३.३ रिटर्नचा नियम शिथिल क रून तीन महिन्याला एक याप्रमाणे रिटर्न असावे.

संगणक सॉफ्टवेअर बंधनकारक करू नये. प्रक्रिया सुरळीत व सुटसुटीत असावी.