शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

गुढीपाडवा : नववर्ष स्वागतयात्रांनी नाशिककरांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:40 PM

गंगापूररोड, शरणपूररोड, तिडके कॉलनी, महात्मानगर,सावरकरनगर या परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधून घेतले. नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये उपनगरांमध्ये स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देउपनगरांमध्ये स्वागतयात्रांचे आयोजनमहिला पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या

नाशिक :हिंदू नववर्षाचा पहिला सण गुढी पाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी साडेसहा वाजेपासून गुढीपाडव्याची लगबग परिसरात पहावयास मिळाली. गंगापूररोड, शरणपूररोड, तिडके कॉलनी, महात्मानगर,सावरकरनगर या परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी लक्ष वेधून घेतले.नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये उपनगरांमध्ये स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील नरसिंहनगर, सावरकरनगर परिसरात शोभायात्रा काढण्यात आल्या. नरसिंहनगर येथील हनुमान मंदिरात हनुमानाचे व गुढीचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक स्वाती भामरे, योगेश हिरे, बापू कोतवाल, अनिल भंडारे आदि उपस्थित होते. नरसिंहनगर येथून निघालेली स्वागतयाात्रा तिरूपती टाऊन, शांतिनिकेतन कॉलनी, कृषी महाविद्यालयामार्गे कॉलेजरोड येथे आली. या स्वागतयात्रेत ग्रामोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते.जुना गंगापूरनाका येथील श्री विघ्नहरण गणेश मंदिरापासून स्वागतयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके, राजेश अहिरे आदिंच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. येथून सुरू झालेली शोभायात्रा कॉलेजरोडे येथे पोहचली. शोभायात्रेत सहभागी जेम्स शाळेच्या मुलांनी स्केटिंग करत लक्ष वेधले. महात्मानगर बस स्थानक येथून नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळक्ष माजी नगरसेवक सुरेश पाटील, शिवाजी गांगुर्डे, अजीत कुलकर्णी यांच्या हस्ते गुढीची पूजा करण्यात आली. ही स्वागतयात्रा, पारिजातनगर, कृषीनगर, बीवायके महाविद्यालयामार्गे कॉलेजरोडवर आली.उंटवाडी रस्त्यावरील लवाटेनगर येथील संभाजी चौकातूनही स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा त्र्यंबकरोडने पी एन्ड टी कॉलनीमार्गे कॉलेजरोड येथे पोहचली. याप्रसंगी नरेंद्र सोनवणे, अशोक अमृतकर, राजेंद्र कोठावदे, शरद नामपूरकर आदिंसह युवक, युवती व महिला पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या. या यात्रेत सहभागी जीवनविद्या मिशनच्या साधकांनी लक्ष वेधून घेतले.तिडके कॉलनीमधील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रात प्रकाश दिक्षित, विवेक पवार, सुदर्शन तातेड, उज्ज्वला पवार आदिंच्या हस्ते गुढीची पूजा करण्यात आली. त्यानंतर स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा वेदमंदीरासमोरून कुलकर्णी उद्यानामार्गे शरणूपररोडने कॅनडाकॉर्नरवरून कॉलेजरोड येथे पोहचली. स्वागतयात्रांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी अस्सल मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता. बहुतांश तरूण, तरुणी लेझीम व ढोलचा तालावर थिरकत होते. काहींनी हातात भगवे ध्वज घेतले होते.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाNashikनाशिकHinduहिंदू