नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शेतकऱ्यांना व महिलांना शेतीपूरक व्यवसाय व बचतगटाचे महत्व याविषयी कृषीकन्यांनी माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गेल्या चार महिन्यांपासून या परिसरात शेतीविषयक माहितीवर अभ्यास करत आहे. सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या शेतकºयांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी शेतीला पुरक असा व्यवसाय करावा, पुरक व्यवसाय असल्यामुळे अचानक होणारा तोटा शेतकºयांना वाचवू शकतो. कुक्कूटपालन, मेंढीपालन, शेततळ्यातील मच्छीपालन, मधुमक्षीकापालन, रेशीम उद्योग आदिंसह विविध शेतीपुरक व्यवसायाची माहिती कृषीकन्यांनी यावेळी शेतकºयांना समजावून सांगितली. पुरक व्यवसायाचे अनेक फायदे शेतकºयांनी समजून घेतले. ज्यामुळे आत्महत्या सारख्या घटना टाळल्या जावू शकतात यासाठी योग्य ती माहिती मिळवून शेती उत्पन्नात भर कशी घालावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील महिलांना घरगुती व्यवसायांचे प्रकार सांगण्यात आले. महिलांनी गट तयार करून वेगवेगळे गृहउद्योग करावे. त्यामुळे उत्पन्न वाढण्यासाठी निश्चीत मदत होते. महिलांनी पापड बनविणे, शिलाई मशीनकाम, मसाले, मिरची पावडर, चिंचेचे पदार्थ, विणकाम, आवळा कॅँडी, मेणबत्ती व अगरबत्ती अशा प्रकारचे लघू उद्योग गटपध्दतीने कशा प्रकारे करता येतात याचे प्रात्यक्षिक यावेळी कृषीकन्यांनी महिलांना दिले. यावेळी बचतगटाच्या महिला व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कृषीकन्या सायली गिते, हर्षदा सानप, दीप्ती थेटे, भाग्यशाला शिरसाट, मयूरी होले, पूनम काळे उपस्थित होते.
शेतीपुरक व लघुउद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 6:37 PM