दाभाडी : मालेगाव येथील एच. एच. एस.एस. मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या ग्रामीण कृषी उद्योजकता जागृती विकास योजना आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील दाभाडी गावात मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषिदूत गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती देत आहेत.
महाविद्यालयांतील कृषिदूत सर्वेश पवार, शुभम पवार, मिलिंद भादुले ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये माती परीक्षण, प्रक्रिया समजून सांगितली जात आहे. तसेच बीज प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, चारा प्रकिया, बीज व्यवस्थापन, कीड नियंत्रण, रोग व्यवस्थापन साठवणूकबद्दल माहिती देत आहेत.
याप्रसंगी दामोदर निकम, रामदास निकम, रवींद्र पवार, अनिल पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. राऊत, उपप्राचार्य डॉ. पी. के. सूर्यवंशी कार्यक्रम समन्वयक, प्रा. एस. व्ही. अहिरे, प्रा. जी. एस. बनसोडे, एस. व्ही. बागल, या विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.